नऊ लाख दिले पण ‘ तो ‘ फास आवळतच राहिला अन..

सरकारकडून कितीही प्रयत्न करण्यात येत असले तरी अवैध सावकारी थोपवण्यात मात्र सरकारला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे अर्थात कायदेशीर पद्धतीने कर्ज मिळवणे अवघड असल्याने अनेकदा नागरिक अशा सावकाराच्या जाळ्यात अडकतात आणि त्यानंतर त्यांचे शोषण सुरू होते.

नाशिक शहरातील मुंबई नाका येथे एक अशीच घटना समोर आलेले असून एका खाजगी सावकाराने पाच टक्के व्याजाच्या बोलीवर अवघे नऊ लाख रुपयांचे कर्ज दिले मात्र फिर्यादी व्यक्तीकडून सुमारे 50 लाख 90 हजार रुपये आतापर्यंत काढलेले आहेत आणि अजूनही वीस लाख रुपये देणे बाकी आहे असे सांगत त्यांची पिळवणूक सुरू केली होती अखेर व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेऊन सावकाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

सुरेश पुजारी ( वय 54 ) असे पीडित व्यक्तीचे नाव असून त्यांनी विजय शंकरराव देशमुख या व्यक्तीकडून पाच टक्के व्याजाच्या बोलीवर 2007 साली नऊ लाख रुपये घेतले होते. 2022 पर्यंत व्याजापोटी म्हणून 44 लाख 90 हजार रुपये त्यांनी सावकाराला दिले आणि उर्वरित रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून देशमुख याच्या खात्यात जमा केली मात्र तरीदेखील देशमुख याने अजून पैसे बाकी आहे असे सांगत त्यांची पिळवणूक सुरू केली होती त्यानंतर अखेर तक्रारदार यांनी पोलिसात धाव घेतली आहे .