मुंगी मारण्यासाठी हातोडा ? न्यायालयाचा सरकारला दणका

शेअर करा

अन्न औषध प्रशासनाकडून करण्यात आलेली एक कारवाई चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असून जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचा अन्न आणि औषध परवाना प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेला होता त्यानंतर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली त्यावेळी प्रशासनाने घेतलेला निर्णय न्यायालयाने बुधवारी रद्द केलेला असून जॉन्सन बेबी पावडर वितरण आणि विक्रीचा मार्ग खुला झालेला आहे.

न्यायालयाने आपले आपला निर्णय जाहीर करताना राज्य सरकारची कारवाई ही अवास्तव आणि मनमानी आहे. मुंगी मारण्यासाठी सरकार हातोडा वापरू शकत नाही अशी टिप्पणी केली सोबतच उत्पादनाच्या एका संचातील नमुना मानक दर्जाचा नसेल तर त्या कंपनीचा परवानाच रद्द करणे हे देखील वाजवी नाही असे देखील प्रशासनाला ठणकावले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची इतर उत्पादने आणि इतर कंपन्यांच्या उत्पादनाबाबत देखील सरकारने कठोर मानके स्वीकारल्याचे दिसत नाही असे देखील निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे सोबतच अन्न औषध प्रशासनाने पहारेकरी असणे आवश्यक आहे त्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सनवरील कार्यवाही आणखी प्रलंबित ठेवू शकत नाही असे म्हटलेले आहे.


शेअर करा