
ऊस तोडीसाठी मजूर मिळत नसल्याने सध्या या क्षेत्रात अनेक एजंट लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. अनेकदा शेतमालकाकडून पैसे घेतल्यानंतर देखील अजून पाठवले जात नाहीत आणि उसाचे पीक लावून देखील वणवण फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते . एकीकडे कारखान्याकडून ऊसतोड मिळत नाही तर दुसरीकडे ऊस तोडीसाठी मजूरच मिळत नाही अशा दुष्टचक्रात सध्या शेतकरी अडकलेला दिसत आहे. असेच एक खळबळ जनक असे प्रकरण लातूर जिल्ह्यात निलंगा येथे समोर आलेले असून अनिल गोयतराम अग्रवाल नावाच्या एका व्यक्तीला ऊसतोडसाठी कामगार पुरवठा करतो असे सांगत भगवंत यशवंत मैद नावाच्या व्यक्तीने तब्बल 24 लाख रुपयांची उचल घेतली आणि त्यानंतर त्याने पलायन केले.
निलंगा पोलीस ठाण्यात तक्रारदार यांनी भगवंत मैद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते मात्र तो आढळून येत नव्हता . सांगली परिसरात तो राहत असल्याची माहिती पोलिसांना हाती लागली आणि 11 जानेवारी रोजी पोलिसांनी तात्काळ तिथे पोहोचत त्याला ताब्यात घेतले. निलंगा येथे त्याला आणण्यात आलेले असून पुढील कारवाई सुरुवात करण्यात आलेली आहे .