पळून गेलेले काका पुतणी पोलिसांना आढळून आले तेव्हा चक्क..

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण गुजरात इथे समोर आलेले असून राजकोट जिल्ह्यात एका काकाचे त्याच्या अल्पवयीन पुतणीसोबत प्रेमसंबंध जुळले मात्र आपला विवाह समाजमान्य होणार नाही यातून त्या दोघांनी आत्महत्या केलेली आहे. राजकोट जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार उघडकीला आलेला असून नागरिकांना माहिती समजली त्यावेळी ते दोघेही तडफडत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत मुलीचे नाव आलिया बावलिया असे असून तिचे नात्याने तिचा काका लागत असलेल्या रायधन जोगडिया नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध सुरू झालेले होते. त्यांच्यातील नाते काका पुतणीचे असल्याने ते एकमेकांना भेटत होते त्यामुळे घरच्यांना देखील काही संशय आला नाही मात्र त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले आणि आपला विवाह समाजमान्य होणार नाही म्हणून त्यांनी परिसरात एक सामाजिक कार्यक्रम होता त्यावेळी भेटल्यानंतर पळून जाण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी खूप शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाहीत.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली मात्र याच दरम्यान आलिया आणि रायधन हे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आले. नागरिकांनी तात्काळ तिथे धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला अन त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. त्यांच्यातील नाते हे त्यांच्या प्रेमाच्या आड येत होते त्यामुळे त्यांनी हा प्रकार केला अशी माहिती समोर आलेली आहे .