आणखी तीन बाबा ताब्यात , पोलिसांनी धरलं तेव्हा चक्क..

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे जादूटोण्याचा वापर करून आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असा दावा करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी खंबाळा परिसरात बेड्या ठोकलेल्या आहेत. आमच्याकडे पैसे दिल्यानंतर आम्ही अवघ्या काही क्षणात ते दुप्पट आणि तिप्पट करून देतो असे सांगत त्यांनी काही नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले होते.

आपल्याला दिव्य सिद्धी प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपण हे सर्व करू शकतो असा दावा केतन कृष्ण पाटील ( राहणार वज्रेश्वरी ), श्रीनाथ लक्ष्मण भोये , माणिक अर्जुन बात्रा ( राहणार विक्रमगड ) आणि इतर एक व्यक्ती यांनी केला होता . असे दावे करत परिसरातील नागरिकांना त्यांनी आपल्या जाळ्यात ओढलेले होते. कमलेश जोगारी नावाच्या एका व्यक्तीकडून त्यांनी यासाठी दीड लाख रुपये देखील घेतलेले होते जादूटोणा करून आम्ही ह्या दीड लाखाचे पाच लाख करू असे आमिष त्यांनी दाखवलेले होते.

पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी या तीन भामट्यांकडून दोन हजार रुपयांच्या 27 खोट्या नोटांचे बंडल आणि पाचशे रुपयांच्या 75 खोट्या नोटांचे बंडल पोलिसांनी हस्तगत केले . घटनास्थळावरून पोलिसांना काही कोरे कागद , काचेचे तुकडे, पूजेचे सामान , लोखंडी त्रिशूल तसेच काळ्या बाहुल्या आणि दोन वाहने सापडली ती पोलिसांनी जप्त केलेली आहेत. 12 जानेवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.