बंद कंटेनरमधून ‘ उघडा उघडा ‘ लहान मुलांचे आवाज अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर आलेली असून सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. एका बंद असलेल्या कंटेनरमध्ये नक्की कोण आहे असा पोलिसांना प्रश्न पडला म्हणून त्यांनी तो कंटेनर अडवला त्यावेळी कंटेनरमधून उघडा उघडा असे आवाज आल्यानंतर पोलिसांनी हा कंटेनर उघडला त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुले मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्यानंतर हा कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला आणि झाला प्रकार समोर आला.

सदर प्रकार हा मानवी तस्करीचा असल्याचा संशय असल्यावरून पोलिसांकडून हा कंटेनर थांबवण्यात आलेला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यातील मळगाव बाजारपेठेतून जाणारा हा टँकर हेरलेला होता त्यामध्ये लहान मुलांचे आवाज ऐकू येत असल्याने तसेच काही मुलींनी तोंडाला मास्क बांधल्यामुळे हा भलताच प्रकार असल्याचा संशय आला आणि त्यानंतर हा टँकर थांबवण्यात आला. घटनास्थळी तात्काळ काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील धाव घेतली आणि हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा दावा केला .

पोलिसांनी या कंटेनरचा मालक आणि मुलांना गाडीतून खाली उतरवले त्यानंतर जेवण वाढण्यासाठी मुलांना घेऊन जात असल्याचे समोर आलेले आहे. केटरिंगच्या कामात अल्पवयीन मुलांना जुंपणे तसा गुन्हा आहे मात्र ग्रामीण पातळीवर अनेकदा केटरिंगच्या कामासाठी लहान मुलांना जुंपण्यात येते. तालुक्यात एका ठिकाणी लग्नासाठी या मुलांना घेऊन जात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचा देखील जीव भांड्यात पडला आणि मुलांनी देखील इतर कुठलीच तक्रार न केल्याने अखेर हा कंटेनर सोडून देण्यात आला .


शेअर करा