‘ आवाज वाढीव डीजे ‘ केलं पण संपूर्ण वऱ्हाड गेलं रिकामं

पारंपारिक वाद्य सुश्राव्य असून त्या तुलनेत डीजेचा त्रास अनेक जणांना मोठ्या प्रमाणात होतो. अनेक जणांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदयविकाराचे झटके येऊन प्राण गमावलेले असून अशीच एक आणखी घटना बिहार येथील लग्नात घडलेली आहे. नवरदेवानेच यामध्ये प्राण गमावलेले असून यानंतर सर्व वऱ्हाडाला पुन्हा रिकाम्या हाताने घरी परतावे लागलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुरेंद्रकुमार राय असे या नवरदेवाचे नाव असून नवरदेव नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालत असताना अचानक कोणीतरी डीजेचा आवाज वाढवला आणि त्यानंतर नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले. त्याने हाताने आवाज कमी करण्यासाठी देखील इशारा केला मात्र अनेकजण डान्स करण्यात गुंगलेले असल्याने त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही अखेर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे.