
सोशल मीडियावर पॉप्युलर होण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसा नाही त्यात तरुण पिढीच्या हातात युट्युब शॉर्ट , रिल्स आणि स्मार्टफोन आल्यानंतर तरुणाईने चक्क धुमाकूळ घातलेला आहे. भररस्त्यात कुठेतरी मध्येच थांबून व्हिडिओ बनवणे यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे स्टंट करणे यात आत्तापर्यंत अनेक जणांनी प्राण गमावलेले असून अशीच एक घटना पुण्यात समोर आलेली आहे. सदर घटनेत एका महिलेचा मृत्यू झालेला असून दोन जणांना पोलिसांनी गजाआड केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तसलीम फिरोज पठाण (वय 31 राहणार गोडगाव बार्शी सध्या उरुळी देवाची ) असे महिलेचे नाव असून मोहम्मदवाडी येथील कृष्णा नगर मधील पालखी रोडवर सहा मार्च रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. आयान आणि झाहीद ( दोघेही राहणार सय्यद नगर हडपसर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्यासाठी मोटरसायकलवर स्टंट करत त्यांचा हा प्रकार सुरू होता त्यावेळी तसलीम या दुचाकीवरून घरी चाललेल्या होत्या त्यावेळी हा अपघात झाला आणि त्यात तसलीम यांनी प्राण गमावलेले आहेत .