वडगाव मावळच्या तरुणीचा ‘ मधाळ सापळा ‘ रात्री तयारच होता अन..

शेअर करा

मोबाईलमध्ये कॅमेऱ्याची सुविधा आल्यापासून हनीट्रॅप गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत असून असेच एक प्रकरण पुणे जिल्ह्यात समोर आलेले आहे. एका तरुणीच्या सहाय्याने युवकांना भेटण्यास बोलवायचे आणि त्यानंतर त्यांना मारहाण करत त्यांची लूट करायची असा प्रकार कामशेत परिसरात सुरू होता त्यानंतर पोलिसांनी या टोळक्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत.

सदर प्रकरणात एका महिलेला देखील ताब्यात घेण्यात आलेले असून एक मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास या महिलेने तक्रारदार यांच्या फोनवर फोन करून त्यांना शिवशंकर मंगल कार्यालय येथे भेटण्यासाठी बोलावलेले होते. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे चार मित्र हे तिथे पोहोचले त्यावेळी आरोपी तिथे दबा धरून बसलेले होते. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना गाडीत कोंबून त्यांच्या विरोधात बलात्काराची केस करण्याची धमकी दिली. आरोपींनी त्यांना कुसगाव येथील एका डोंगरात नेऊन फोटो काढले आणि दोन लाख रुपये द्या नाहीतर तुमचे फोटो व्हायरल करू असे देखील त्यांना सांगण्यात आले. आरोपींनी त्यांना चक्क लोणावळा, कुसगाव, वडगाव, तळेगाव परिसरात घेऊन जात मारहाण केली असे फिर्यादींचे म्हणणे आहे.

पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासांच्या आत आरोपींना नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे जाऊन ताब्यात घेण्यात आलेले आहे. लाया अर्जुन निळकंठ ( वय 24 राहणार कामशेत ), रुपेश उर्फ कवठ्या विजय लालगुडे ( वय 24 राहणार कुसगाव खुर्द ), सतीश कृष्णकुमार बिडलाम ( वय 28 राहणार कामशेत ), रोहित गणेश चोपडे ( वय 27 राहणार कामशेत ), साहिल महादेव भिसे ( वय 20 राहणार चिंचवड ) आणि वीस वर्षीय एक तरुणी ( राहणार वडगाव मावळ ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


शेअर करा