गूढ उलगडलं..प्रियकरासोबत विवाहिता पळून पुण्यात आली अन..

पुणे शहरात खडकी परिसरात एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी उघडकीला आढळून आलेला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर जे सत्यसमोर आले ते त्यावर पोलिसांचा देखील सुरुवातीला विश्वास बसला नाही. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःची मुलगी अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याकारणाने या मुलीच्या आईने तिच्या प्रियकराला सोबत घेऊन स्वतःच्या मुलीचा खून केलेला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा देखील प्रयत्न केलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार दोन मार्च रोजी खडकी रेल्वे स्टेशनजवळ एका मोकळ्या जागेत तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आलेला होता. गळा दाबून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर या प्रकरणात कुठलाही पुरावा पोलिसांकडे नव्हता सोबत मुलीची देखील ओळख पटत नव्हती मुलीच्या अंगावर एक शाल आढळून आणली होती त्यावरून पोलिसांनी अखेर प्रकरणाची पाळेमुळे खणून काढत अखेर महिलेला तिच्या प्रियकरासोबत अटक केलेली आहे.

आरोपी महिला ही विवाहित असून तिला आणखीन एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या प्रियकरासोबत पळून पुण्यात आलेली होती. रात्री झोपत असताना ही मुलगी सतत रडत असायची आणि याचा या दोघांना त्रास होत होता म्हणून त्यांनी या तीन वर्षाच्या मुलीचा खून केलेला असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह निर्जनस्थळी नेऊन फेकून दिलेला होता मात्र मृतदेह ताब्यात आल्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलेले आहे .