भोसरीत पोलीस चौकशी सुरु असतानाच व्यक्तीची तब्येत बिघडली अन ..

आपल्या दारात पोलीस आल्यानंतर आपल्याला घेऊन जातील या भीतीने अनेक जण घाबरून जातात आणि त्यातून हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो याआधी देखील असेच प्रकार घडलेले असून आणखीन एक प्रकार पुण्यात समोर आलेला आहे. पोलीस चौकशी करत असतानाच एका व्यक्तीची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात नेलेले असताना त्याचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, लक्ष्मण दामू पवार ( वय 45 राहणार शास्त्री चौक भोसरी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांच्याकडे आमली पदार्थ असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळालेली होती त्यानंतर पथक रात्री शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास लक्ष्मण पवार यांच्याकडे जाऊन चौकशी करत होते मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

पोलीस चौकशी करत असतानाच लक्ष्मण पवार यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली मात्र या प्रकरणात कुठलाही वेगळा प्रकार नाही असे भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितलेले असून सदर प्रकरणाचा तपास पुणे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. मयत व्यक्ती यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण नाहीत. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.