बायकोचे तिच्या चुलतभावासोबतच संबंध , पुण्यात न्यायालयाकडून पतीची मागणी मंजूर

लग्न झालेले असताना देखील विवाहबाह्य संबंध ठेवणे आणि त्यानंतर पतीला शारीरिक संबंधास नकार देणे आणि त्याच्यासोबत कुठलेही शारीरिक संबंध न ठेवणे ही एक प्रकारची मानसिक क्रूरता आहे असा निष्कर्ष काढत एका कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या घटस्फोटाचा अर्ज मंजूर केलेला आहे . पुण्यातील हे प्रकरण असून मुख्य न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी हा निर्णय दिलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित पती हा एका कंपनीत नोकरीला असून त्याची पत्नी गृहिणी आहे. दोघांचा 2020 मध्ये विवाह झालेला होता त्यानंतर ही पत्नी सतत माहेरी जात होती सोबतच तिने पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास वेळोवेळी नकार दिला त्यानंतर पतीला शंका आली म्हणून त्याने तिचा मोबाईल तपासला त्यावेळी त्याच्या पत्नीचे तिचा चुलत भाऊ याच्यासोबतच अनैतिक संबंध असल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर तिने घरातून पलायन केले.

तिच्या पतीने त्यानंतर पोलिसात धाव घेतली आणि ती हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तिला शोधून आणले त्यावेळी तिने मी माझ्या मर्जीने घर सोडून गेलेले आहे मला माझ्या पतीसोबत संसार करायचा नाही असे देखील म्हटलेले होते त्यानंतर पीडित पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला होता त्यावर अखेर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेले असून विवाह झाला असताना दुसरीकडे शारीरिक संबंध ठेवणे आणि पतीला नकार देणे ही क्रूरता असल्याचे म्हटलेले आहे.