‘ आमची मुलगी तुझा भाऊ का घेऊन गेला ? ‘ म्हणत तरुणाला गाठलं अन..

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे समोर आलेली असून एका तरुणाला ‘ आमची मुलगी तुझा भाऊ का घेऊन गेला ? ‘ म्हणून सहा जणांनी गाठून मारहाण केलेली आहे सोबतच त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून त्याचा मोबाईल देखील फोडून टाकण्यात आलेला आहे. एक मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना वैराग पोलीस ठाणे हद्दीत घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ज्ञानेश्वर गोडगे , तुकाराम गोडगे, किशोर अडसूळ , बाबा निकम , महेश शिरसाठ , विष्णू गोडगे अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून एका गावातील एक मुलगी पळून गेलेली होती त्यानंतर त्या चौकशीसाठी वैराग पोलीस ठाण्यात फिर्यादी यांना पोलिसांनी बोलावलेले होते त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आले तेव्हा फिर्यादी त्याच्या मित्रांसोबत घरी जात असताना त्यास गाठून मारहाण करण्यात आली.

तुझा भाऊ आमची मुलगी पळून का घेऊन गेला ? असे म्हणत तक्रारदार व्यक्ती यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या कपाळावर लोखंडी रॉड मारून त्यांना जखमी करण्यात आले तसेच त्यांच्या खिशातील 45 हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन देखील आणि 22 हजार रुपयांचा मोबाईल देखील फोडून टाकला असे तक्रारदार यांचे म्हणणे असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.