
कोरोना काळात मोजक्या लोकांमध्ये लग्न होत असल्याकारणाने अनेक बालविवाह देखील पार पडलेले आहेत मात्र अद्यापदेखील अशा अनेक घटना समोर येत असून परभणी इथे एक बालविवाहाचे प्रकरण समोर आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये पीडित मुलीचे वय अवघे तेरा वर्ष असून तिचा विवाह हा तब्बल 40 वर्षाच्या व्यक्तीसोबत लावण्यात आलेले होते. जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी स्वतः पोलीस ठाण्यात बसून 13 जणांवर गुन्हा दाखल करून घेतलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, परभणीच्या पाथरी शहरातील आदर्शनगर येथे 2 डिसेंबर 2022 रोजी एक बालविवाह झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती त्यावरून जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी प्रकरणात लक्ष घातले आणि कारवाई केली. पाथरी येथील आदर्श नगरमध्ये अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीचा विवाह चाळीस वर्षाच्या व्यक्तीसोबत लावण्यात आलेला होता. या प्रकारात काही आर्थिक व्यवहार देखील झाल्याची माहिती समोर आलेली होती
मुलगी अल्पवयीन असल्याकारणाने तिला सज्ञान दाखवण्यासाठी चक्क बनावट दस्तावेज निर्माण करण्यात आले हे दस्तावेज देखील आता पोलिसांनी जप्त केलेले असून बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली रंगारी यांच्या फिर्यादीनंतर मुलीचा पती, सासू, मुलीचे आई-वडील यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर इतर व्यक्तींवर देखील इतर कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.