महिलेकडे खंडणी मागत पतीची दुचाकी घेतली अन त्यानंतर..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती परिसरात उघडकीला आलेली असून एका महिलेला खंडणीची मागणी करत तिच्या पतीकडील दुचाकी जबरदस्तीने पळून नेण्यात आलेली आहे. अमरावती शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 तारखेला ही घटना उघडकीला आलेली असून आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, निखिल वाढिवे ( वय 36 राहणार समाधाननगर ) असे आरोपीचे नाव असून सदर महिला आणि निखिल हे एकमेकांना तीन वर्षांपासून ओळखत आहेत . 2020 मध्ये निखिल याने दुचाकीच्या व्यवहारात महिलेची फसवणूक केलेली होती मात्र त्याची वर्तणूक पाहता महिलेने अखेर पैसे आणि दुचाकीचा विषय सोडून दिला.

नऊ मार्च रोजी आरोपी तिच्या घरी गेला आणि त्याने महिलेला शिवीगाळ करत मला पंधरा हजार रुपये दे नाहीतर तुला कामावर जाऊ देणार नाही अशी धमकी दिली. सदर घटनेनंतर महिला गप्प राहिली कारणाने आरोपीने महिलेच्या भावाला त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन धमकावले आणि त्यानंतर 14 मार्च रोजी महिलेचा पती त्यांच्या भावाच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी निघालेला असताना निखिल याने त्यांना दुचाकीने धडक दिली आणि त्यानंतर त्यांची दुचाकी हिसकावून तेथून पलायन केले. पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिसात या संदर्भात फिर्याद दिलेली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा