
आई इतकं प्रेम जगातली कुठलीही महिला देऊ शकत नाही. कितीही काही झालं तरी आई शेवटी आईच असते. आपल्या मुलाच्या रक्षणासाठी ती कुठेही काहीही कधीही करू शकते आणि त्याच्याच जीविताला जर काही झालं तर जे काही होईल याची कल्पना देखील करवत नाही असाच एक प्रकार केरळ इथे समोर आलेला असून इदुक्की जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे.
इदुक्की जिल्ह्यात एक महिला नवजात मुलाला स्तनपान करत असताना त्याच्या घशात दूध अडकले आणि या बाळाचा त्यात मृत्यू झाला. सदर घटनेनंतर महिला ही डिप्रेशनमध्ये गेली आणि त्यानंतर तिने देखील गुरुवारी घराशेजारी असलेल्या एका विहिरीत आत्महत्या केली. सदर महिला आणि तिचा मुलगा या दोघांचेही मृतदेह या विहिरीत आढळून आलेले असून कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे
लिसा असे या 38 वर्षीय आईचे नाव असून तिचा मुलगा बेन दोघेही कैथपथल येथील रहिवासी आहेत. घरातील बाकीचे सदस्य चर्चमध्ये गेलेले होते त्यानंतर ते घरी आले त्यावेळी आई आणि तिचा मुलगा दोघेही दिसून आले नाही त्यानंतर त्यांचा शोध सुरू केला त्यावेळी त्यांचे मृतदेह विहिरीत आढळून आले.