
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पती-पत्नी दोघेही काम करत असल्याने घरातील कामांसाठी वेळ मिळत राहत नाही त्यामुळे घरात मोलकरीण नावाच्या व्यक्तीची इंट्री होते मात्र काही ठिकाणी मोलकरीण असलेल्या या महिलांची नियत बदलते आणि त्याचा मोठा त्रास कामाला घेतलेल्या काम मालकाला सहन करावा लागतो . मुंबईतील अंधेरी येथे असाच एक प्रकार समोर आलेला असून एका मोलकरणीने मालकाच्या दागिन्यांवर हात साफ केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार असलेल्या नफीसा मुकादम ( वय 67 ) या मिल्लतनगर परिसरात राहत असून बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये त्यांची शमशुलला फिरोज शेख हिच्यासोबत ओळख झालेली होती. वयोवृद्ध महिलेने तिला स्वतःकडे कामाला म्हणून ठेवून घेतले आणि त्यानंतर मुकादम यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्यातील सोन्याच्या अंगठ्या किचनच्या ओट्यावर ठेवलेल्या होत्या. त्या नमाजपठण करण्यासाठी गेल्या तेव्हा भाकरी बनवून शेख ही निघून गेलेली होती. नमाज पठण करून मुकादम आल्या त्यावेळी अंगठ्या गायब झालेल्या होत्या. घरात कोणी इतर व्यक्ती देखील आलेला नसल्या कारणाने या अंगठ्या तिनेच पळवल्या असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिलेली आहे .