चक्क टॉयलेटमधून खेचत प्रेमीयुगुलाला पोलिसांनी काढले बाहेर

प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेल्यावर कुठे जायचं हा प्रेमी युगुलांपुढे मोठा प्रश्न असतो. बिहार येथील एका प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून आसाम येथून हे प्रेमीयुगुल पळून गेले होते. कुठे जायचं हे स्पष्ट नसल्याकारणाने बिहारच्या आरा रेल्वे स्थानकावर त्यांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस सक्रिय असताना हे प्रेमीयुगुल चक्क रेल्वेच्या टॉयलेटमध्ये आढळून आलेले आहेत.

14 मार्च रोजी दोघेही आसाम येथील घरातून पळून गेले होते आणि त्यानंतर मुंबईला रवाना झाले. मुलींच्या वडिलांनी आसाम येथील एका पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली आणि आसाम पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने तपासाला सुरुवात केलेली होती मात्र त्यानंतर दोघे चक्क रेल्वेच्या टॉयलेटमध्ये आढळून आलेले आहेत.

संजय दास असे या प्रियकराचे नाव असून तो असामधील रोजही जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो एक ड्रायव्हर असून संबंधित तरुणी आणि तो शेजारी राहत होते . मुलगी अल्पवयीन असून इयत्ता नववीत शिकते. शाळेत जात असताना त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले आणि त्यानंतर त्याने तिला आपला मोबाईल नंबर दिला आणि त्यांच्यात फोनवर देखील बोलणे सुरू झाले. फोनवर बोलत असताना त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्यानंतर त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या.

मुलीच्या घरी समजल्यानंतर विरोध सुरू झाला त्यानंतर 14 मार्च रोजी दोघेही आसामच्या दिब्रुगड स्टेशनवर पोहोचले आणि फरार झाले.पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आणि मुलीच्या घरच्यांनी तिच्या मैत्रिणीकडे देखील चौकशी केली त्यावेळी संजय याने तिचे अपहरण केल्याचे समजले . बिहारच्या आरा रेल्वे स्थानकावर रेल्वे आलेली असताना पोलीस रेल्वेच्या जवळ घुटमळत आहे हे पाहिल्यानंतर दोघेही ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जाऊन लपले ही बाब पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांना टॉयलेटमधून ताब्यात घेण्यात आलेले आहे.