
सोशल मीडियावर सध्या एका प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून 42 वर्षीय महिला तिच्या मुलाचा मित्र असलेल्या एका तरुणाच्या प्रेमात पडलेली आहे त्यावरून तिच्यावर जोरदार टीका केली जात असून या महिलेला चार मुले असल्याची माहिती आहे. सध्या ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेली आहे त्याचे वय अवघे 24 वर्ष आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तान्या असे या महिलेचे नाव असून ती आणि तिचा प्रियकर जोसु तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत ज्यावेळी तिचे वय 39 वर्षे होते त्यावेळी तिचा प्रियकर अवघा 21 वर्षांचा होता. तान्या हिची 12 आणि 14 वर्षांची मुले तिच्या प्रियकराच्या घरी व्हिडिओ गेम खेळायला जात असायचे त्यातून त्यांची ओळख झाली . मागील वर्षी त्यांनी लग्न देखील केलेले आहे.
संबंधित जोडप्याने या प्रकरणी बोलताना आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असली तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही असे म्हणत रोज सोशल मीडियावर ते आपले वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहेत. त्यांच्या व्हिडिओवर अनेक लोक टीका देखील करत असून तान्या हिने जोसु याला मूर्ख बनवलेले आहे अशा देखील काही कमेंट येत असून लोकांच्या त्रासाला कंटाळून तिने जेव्हा आम्ही प्रेमात पडलो त्यावेळी तो वयस्क झालेला होता असे म्हटलेले आहे. तुम्ही टीका करत रहा आमच्यावर काही परिणाम होणार नाही असे देखील तिने ठणकावलेले आहे.