लाडका मिठू ‘ असा ‘ पोहचवू शकतो आपल्याला तुरुंगात , कायदा काय सांगतो ?

उत्तर प्रदेशात सारस पक्षाला घरात ठेवल्यानंतर याप्रकरणी सरकारने गंभीर दखल घेत अखेर त्याला इतरत्र नेऊन ठेवले आहे. जखमी अवस्थेत सारस पक्षी सापडल्यानंतर परिसरात राहणारे अरिफ गुर्जर यांनी त्याला अमेठी येथील राहत्या घरी आणून त्याच्यावर उपचार केले होते आणि याच दरम्यान सारस पक्षासोबत त्यांची चांगलीच मैत्री झालेली होती. त्यांच्या मैत्रीला राजकारणाचे ग्रहण लागले आणि अखेर या सारस पक्षाच्या नशिबी बंदिवास आला .

महाराष्ट्रात देखील अनेक कुटुंबात पोपट पाळण्याची हौस असून कायद्यानुसार पोपट पाळण्याला बंदी आहे. अनेकदा काही नागरिक घरात पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवून आपल्याला हा पोपट सापडला होता तो आजारी अवस्थेत होता असा देखील बनाव रचतात मात्र पोपट पाळण्याला कायद्याने बंदी आहे. सर्वप्रथम असा पक्षी किंवा प्राणी जो नैसर्गिक अधिवासात राहू शकतो आणि देशात इतरत्र देखील आढळतो अशा प्राण्यांना आणि पक्षांना कायद्याने पिंजऱ्यात ठेवण्यास बंदी आहे. आपल्याला जर असा प्राणी पक्षी आढळला तर सर्वप्रथम त्याच्यावर प्राथमिक उपचार करून स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी कळवणे बंधनकारक आहे तर जवळच्या पोलीस ठाण्यात देखील या प्रकरणी माहिती देणे गरजेचे आहे असेही कायदा सांगतो.

कुत्रा, मांजर , गाय , म्हैस , शेळी, काही खास प्रकारची कबुतरे, मेंढी, ससा ,कोंबडा, लहान मासे यांना पाळण्यास तशी कायद्याने कुठली बंदी नाही मात्र जर आपण आपल्या घरात पोपट , मोर , बदक काही खास प्रकारचे , गावठी तीतर , घुबड ,बहिरी ससाणा ,उंट ,माकड, हत्ती, हरीण ,मगर ,कासव असे प्राणी आपल्या घरात पाळत असाल तर ते बेकायदेशीर आहे.

पाळीव प्राणी आणि पक्षांवर विष प्रयोग करणे,लोखंडी साखळीने त्यांना बांधून ठेवणे ,जड दोरीने बांधणे ,छेडछाड करणे ,त्यांच्याशी दुखापत करणे त्यांना उपाशी ठेवणे ,त्यांच्या अंड्याचे नुकसान करणे ,घरटे नष्ट करणे ,करमणुकीसाठी त्यांचा वापर करणे ,त्यांच्यावर अधिक वजन लादणे असे प्रकार केले तर सुमारे दोन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची देखील शिक्षा आहे सोबतच आर्थिक दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.