देवेंद्र फडणवीस यांनी ‘ तो ‘ मेसेज वाचताच सूत्रे हलली , पुण्यातून तरुण ताब्यात

शेअर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक कार्यशैली महाराष्ट्राला परिचित आहे . त्यांच्या अशाच कार्यशैलीचा प्रत्यय देणारी एक घटना पुण्यात समोर आलेली असून व्यवसायातील पैसे न दिल्याने आर्थिक तंगी निर्माण झाल्यानंतर एका व्यक्तीने आत्महत्या करण्याबाबत व्हाट्सअपवर मेसेज टाकला होता त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर त्यांना एका व्यक्तीने हा मेसेज दाखवल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ या तरुणाला शोधून काढले आणि त्याचे समुपदेशन केले.

उपलब्ध माहितीनुसार, पुण्यातील दत्तवाडी परिसरात लक्ष्मीनगर येथे हा 32 वर्षे तरुण राहत असून इंटरियर डिझाईनचा त्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणारे मटेरियल तो पुरवण्याचे काम कमीशन बेसिसवर करतो. त्याने ज्यांना साहित्य पुरवलेले होते त्यांनी त्याचे पैसे दिले नाहीत आणि दुकानदाराला पैसे देण्यासाठी त्यांनी दुसऱ्याकडून पैसे उसने घेतले होते त्यामुळे अनेक जणांनी पैशासाठी तगादा लावलेला होता.

उधारीचे रक्कम ही तब्बल एक कोटींवर गेली त्यानंतर एका व्यक्तीने पोलिसातच तक्रार करतो असे सांगितले म्हणून या तरुणाला दुसरा कुठला पर्याय राहिला नाही आणि तो घाबरून गेलेला होता. त्याने आपण आत्महत्या करत आहोत असा मेसेज त्याच्या मित्रांना पाठवला आणि हा मेसेज अखेर देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला त्यानंतर तात्काळ या प्रकाराची माहिती पोलीस आयुक्तांना देण्यात आली आणि आपण पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपयुक्त अमोल झेंडे यांनी तात्काळ कारवाई करत त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्याचे प्राण वाचवले आहेत.


शेअर करा