अल्पवयीन मुलांसाठी 40 किलोमीटरपर्यंत भटकायचा , तब्बल इतके केले खून अन ..

देशात एक खळबळजनक असा प्रकार नवी दिल्ली इथे समोर आलेला असून रोहिणी न्यायालयाने सहा मे रोजी एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी एका व्यक्तीला दोषी ठरवलेले आहे . आरोपीने सात वर्षात 30 पेक्षा जास्त मुलांवर देखील अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचे उघडकीला आलेले आहे . त्याच्या शिक्षेबाबत न्यायालय 20 मे रोजी निर्णय देणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रवींद्र असे त्याचे नाव असून तो दिल्लीत मजूर म्हणून काम करण्यासाठी आलेला होता. त्याला अमली पदार्थाचे व्यसन लागले त्यानंतर सात वर्षात त्याने 30 पेक्षा जास्त मुलांवर बलात्कार केले आणि त्यांची हत्या केली. त्याने या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे.

2008 मध्ये तो उत्तर प्रदेशातील कासगंज येथून दिल्लीत कामासाठी आलेला होता त्यावेळी त्याचे वय 18 वर्षे होते. रोज दारू किंवा ड्रग याची सवय लागल्यानंतर अल्पवयीन मुले कुठे भेटतील याच्या शोधासाठी तो 40 किलोमीटरपर्यंत भटकायचा. 2008 मध्ये त्याने सर्वप्रथम एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली त्यानंतर त्याला त्याची चटकच लागली आणि अशाच पद्धतीने त्याने आतापर्यंत 30 पेक्षा जास्त मुलांवर अत्याचार केल्याचे समोर आलेले असून त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.