इंस्टाग्राम रील्ससाठी गाठली क्रूरतेची पातळी , मोर पकडला अन..

देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर सर्वांनाच आवडतो. मोराची पिसे अत्यंत सुंदर असल्याने या पिसांच्या तस्करीसाठी देखील अनेक रॅकेट कार्यरत आहेत मात्र सोशल मीडियावर एक घटना सध्या समोर आलेली असून त्यातील कृतीची पातळी पाहिली तर आपल्याला देखील संताप आल्याशिवाय राहणार नाही. मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यात एक मुलगा मोराची पिसे खेचून काढताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यासाठी त्याने हा प्रकार केलेला असून अखेर हा व्हिडिओ वनविभागापर्यंत पोहोचला असून रिठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बाईकच्या नंबर प्लेटवरून आरोपीचा शोध घेण्यात आलेला असून त्याचे नाव अतुल कोहाने असे असल्याची माहिती आहे पोलीस त्याच्या घरी पोहोचले त्यावेळी तो फरार झालेला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अतुल हा एका मोरासोबत दिसत असून त्याने एका मोराला पकडून एकेक करून त्याचे पिसे खेचून काढलेली आहेत. त्याच्या या कृतीच्या विरोधात अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केलेला असून त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्हा दाखल झाल्याचे समजतात तो फरार झालेला आहे मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत.