58 वर्षाच्या सासूबाईंना बाळ झालं , सुनेचे खळबळजनक आरोप

देशात एक भलतेच प्रकरण सध्या चर्चेत आलेल्या असून उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ही घटना आहे. आग्रा येथील कुटुंब न्यायालयात 58 वर्षाच्या सासूबाईने मुलाला जन्म दिलेला आहे म्हणून त्यांच्या विधवा सुनेने गोंधळ घातलेला असून सासू-सासऱ्यांकडून आपल्याला संपत्तीत वाटा न देण्यासाठी हे मूल जन्माला घालण्यात आलेले आहे असा आरोप सुनबाईने केलेला आहे.

सुनबाईने माध्यमांशी बोलताना चार वर्षांपूर्वी आपले लग्न कमलानगर ठाणे परीक्षेतील एका जिमच्या चालकासोबत झालेले होते मात्र दोन वर्षांपूर्वी आपल्या पतीचे हार्ट अटॅक निधन झाले. त्यांना मुलबाळ नव्हते त्यामुळे पतीच्या निधनानंतर आपण माहेरी जाऊन राहू लागलो . आपला पती हा एकुलता एक असल्याने त्याच्या निधनानंतर आपण संपत्तीचा हिस्सा सासू-सासऱ्यांकडे मागितला मात्र त्यांनी संपत्तीतला कुठलाही वाटा देण्यास आपल्याला नकार दिला.

संपत्तीचा हिस्सा आपल्याला द्यावा लागेल म्हणून 58 वर्षाच्या सासूबाईंनी बाळ होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर एका बाळाला त्यांनी जन्म दिला. सासूसासर्‍यांनी या वयात नवीन वारस जन्माला घातला कारण त्यांना ही सगळी संपत्ती नव्याने जन्माला आलेल्या मुलाच्या नावाने करायचे आहे असा देखील आरोप या सुनबाईने केलेला आहे. सासू-सासर्‍यांनी यावेळी बोलताना आम्ही तिला गावाकडे राहण्याची सुचवले होते मात्र ती गावाकडे न राहता माहेरी निघून गेली. गावाकडील घर जुन्या असल्याकारणाने जेव्हा नवीन घर बांधतील त्यावेळी मी तिथे येईल असे तिने म्हटलेले असून तिच्या या वर्तनाबद्दल संताप व्यक्त केलेला आहे.