शिरूरमध्ये सायबर कॅफेत भलताच प्रकार , पोलीस पोहचले तेव्हा चक्क ..

पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या कॉलेजच्याजवळ सायबर कॅफे असून या कॅफेमध्ये अवैधरीत्या पार्टिशन करून तरुण-तरुणींना असभ्य वर्तन करण्यास मदत केल्या प्रकरणी शिरूर येथील तीन कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार रेखा टोपे यांनी यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अजय हनुमंत रासकर ( वय 22 राहणार पिंपळनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ), विजय उत्तम गाजरे ( वय 23 राहणार रामलिंग रोड शिरूर आणि उमेश संजय जाधव ( राहणार वय 22 राहणार मार्केट यार्ड समोर शिरूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

तीनही व्यक्तींच्या मालकीचे सायबर कॅफे असून त्यांनी त्यांच्या कॅफेमध्ये अवैधरीत्या पार्टिशन केलेले आहे. पार्टिशन केलेले असल्याने अनेक प्रेमीयुगुल या कॅफेमध्ये येऊन असभ्य वर्तन करत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना मिळालेली होती त्यानंतर तिथे जाऊन छापे टाकले असता कॅफे चालकांनी तिथे बैठक व्यवस्थेत बदल करून जोडप्यांना बसण्यासाठी सुविधा करून दिल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.