स्वतःच्या लग्नपत्रिका वाटताना भाजला , तरीही लग्न केले पण दहाच दिवसात

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे समोर आलेली असून लग्नाला अवघे आठ दिवस झाल्यानंतर शहरातील एका 24 वर्षीय तरुणाने 18 तारखेला दौलापूर रोडवर एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, गंगाधर नरसिंहलू आठनलवार असे मयत व्यक्ती याचे नाव असून 11 मे रोजी त्याचा विवाह बामणी इथे पार पडलेला होत. त्याच्या लग्नपत्रिका वाटत असताना त्याच्या पायाला सायलेन्सरचा चटका लागून तो भाजलेला होता मात्र तरी देखील अशा परिस्थितीत त्याने खचून न जाता पत्रिका वाटल्या आणि त्यानंतर त्याचा विवाह पार पडलेला होता.

लग्न झाल्यानंतर त्याची जखम चिघळली आणि त्यानंतर त्याने त्रास असह्य होत असल्याने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज असून घटनेमागे इतरही काही कारण आहे का ? याचा देखील पोलीस सध्या तपास करत आहेत.