
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईतील वांद्रे इथे समोर आलेली मोबाईलच्या माध्यमातून एका अँपमधून कर्ज घेतल्यानंतर चक्क शिक्षिका असलेल्या एका महिलेचे अर्धनग्न फोटो व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला यांचे वय 26 वर्ष असून एका खाजगी अकॅडमीमध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत . कोरोनाच्या काळात त्यांची नोकरी गेल्यानंतर घर खर्चासाठी म्हणून त्यांनी मित्रमंडळीकडून सुमारे दोन लाख रुपये उसने घेतले होते त्यानंतर आर्थिक अडचण आल्यानंतर पैशाच्या शोधात त्या असताना त्यांना गुगल प्ले स्टोअर वरून फायनान्शिअल कॅश ,टॉप लोन, रिंग एप्लीकेशन या पद्धतीच्या ऑनलाइन कर्जाची माहिती मिळाली. त्यांनी सुमारे साडेतीन हजार रुपये आणि पाच हजार आठशे चाळीस रुपये इतके कर्ज घेतले त्यानंतर आठ मे 2023 रोजी त्यांना कर्जाचे पैसे भरा नाहीतर चांगले होणार नाही अशी धमकी देण्याचा प्रकार घडला त्यानंतर त्यांनी 3152 परत फेड देखील केली आणि इतर दोन एप्लीकेशनमधील देखील काही पैसे त्यांनी परत केले.
तक्रारदार महिला यास पुन्हा त्यांच्याकडून कर्ज घेण्याची काहीही इच्छा राहिलेली नव्हती मात्र व्याज अजूनही बाकी आहे असे सांगत वेगवेगळ्या क्रमांकावरून त्यांना शिवीगाळ करून पैशाची मागणी करण्यात आली. धक्कादायक म्हणजे त्यांचा फोटो एडिट करून अर्धनग्न अवस्थेतील फोटो त्यांच्या संपर्कातील लोकांना देखील पाठवण्याची धमकी देण्यात आली आणि त्यांच्या एका मैत्रिणीला हा फोटो देखील पाठवण्यात आला त्यानंतर तात्काळ त्यांनी लोन देणारे ॲप आणि मोबाईल नंबर याच्या आधारे पोलिसात तक्रार दिलेली आहे.