
प्रेमविवाह म्हटल्यानंतर विरोध असे काही समीकरण बहुतांश सर्व ठिकाणी असून जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे प्रेमविवाह करून तरुणाच्या घरी आलेल्या एका नवविवाहित महिलेचे चक्क अपहरण करण्यात आलेले आहे. तिचे अपहरण करण्यासाठी वेगवेगळ्या वाहनातून सुमारे 40 जण आलेले होते. त्यांनी मुलासह त्याच्या कुटुंबीयांना देखील बेदम मारहाण केली आणि त्यानंतर या तरुणीचे अपहरण केले.
उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सावदा इथे ही घटना घडलेली असून सावदा पोलीस ठाण्यात पाच आरोपी यांच्यासह 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सावदा येथील प्रफुल्ल रमेश पाटील ( वय 26 ) या तरुणाने जळगाव येथील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या नात्यातील तरुणीशी प्रेमविवाह केलेला होता आणि त्यानंतर ही तरुणी त्याच्या घरी आलेली होती . आपल्या नात्यातील तरुणीशी प्रेमविवाह केला याचा राग मनात धरत शुक्रवारी दुपारी सावखेडा येथून चाळीस जणांची टीम दाखल झाली आणि त्यांनी या तरुणासोबत त्याच्या घरच्यांना मारहाण करत बळजबरीने या तरुणीला गाडीत बसवून तिथून पलायन केले