मीराबाईच्या लॉजवर ‘ कुठली पाहिजे ? ‘ म्हणत चारजणी केल्या उभ्या

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे प्रकार उघडकीला येत असून अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरात समोर आलेली आहे. एका लॉजिंग मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकलेला असून तब्बल सहा पीडित महिलांची येथून सुटका करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन गुजरात येथील रहिवासी आहेत. कुंटणखाना चालवणाऱ्या पती-पत्नींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्यांच्या विरोधात चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, योगेश भूमे आणि त्याची बायको मीराबाई ( राहणार हनुमान नगर छत्रपती संभाजीनगर ) अशी आरोपींची नावे असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. चिकलठाणा परिसरातील योगेश लॉजिंग बोर्डिंग इथे गेल्या काही दिवसांपासून असा प्रकार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्यानंतर त्यासाठी सापळा रचण्यात आलेला होता.

आरोपी हे 20 ते 25 वयोगटातील पीडित तरुणींची छायाचित्रे दाखवून ग्राहकांना आकर्षक करत होते. रात्री सातच्या सुमारास पोलिसांनी पाचशे रुपयांच्या दोन नोटा देऊन एका बनावट ग्राहकाला पाठवलेले होते त्यावेळी या ग्राहकाने तरुणींची मागणी केली त्यावेळी आरोपींनी चक्क चार महिला त्यांच्यासमोर उभ्या केल्या आणि यातली कुठली पाहिजे ? असा प्रश्न केला . बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई केली आणि आरोपी दांपत्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड आणि इतर साहित्य असा 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून तब्बल सहा महिलांची इथून सुटका करण्यात आल्यानंतर या घटनेची शहरात जोरदार चर्चा होती.