‘ हे प्रेम की यातना ..’ , सतीशच्या बायकोने कपाळावर गोंदलं नाव

आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोण काय करेल याचा काही भरवसा राहिलेला नाही. सोशल मीडियावर सध्या अशाच एका महिलेची जोरदार चर्चा सुरू असून या महिलेने चक्क आपल्या नवऱ्याचे नाव कपाळावर गोंदलेले आहे. महिलेच्या नवऱ्याचे नाव सतीश असे असून तिच्या या आगळ्यावेगळ्या प्रकारावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, ही महिला बंगळूर येथील रहिवासी असून तिने तिचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की ती महिला टॅटू आर्टिस्ट कडून तिच्या कपाळावर तिच्या पतीचे नाव सतीश असे गोंदवून घेत आहे . व्हिडिओ शेअर करताना तिने खरे प्रेम असे कॅप्शन दिलेले आहे.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला असून सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक लोकांनी तो लाईक केलेला आहे तर सुमारे सव्वा कोटी नागरिकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तिच्या या प्रकारावर अनेक जणांनी हा निव्वळ मूर्खपणा आहे असे देखील म्हटलेले असून काही जणांनी अशा मूर्खपणाने तुमचे प्रेम सिद्ध करू नका असे देखील म्हटलेले आहे.