अल्पवयीन प्रेयसीला भेटल्यावर ‘ सेकंड टाईम ‘ त्यानं असंच केलंय

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक बातमी सध्या चांगलीच चर्चेत आलेली असून अमरावती येथील ही घटना आहे. जर तू माझ्यासोबत प्रेमसंबंध तोडले तर तुझा खून करेल अशी धमकी देत एका प्रियकराने चक्क त्याच्या अल्पवयीन प्रेयसीचा मोबाईल घेऊन पलायन केलेले आहे. पीडित मुलीने गाडगेनगर पोलिसात दाखल होत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.

अल्पवयीन मुलीने म्हटल्याप्रमाणे आपण त्याला दोन वेळा मोबाईल घेऊन दिलेला होता त्याला पैसे देखील दिले मात्र त्यानंतर देखील त्याचे मोबाईलप्रेम कमी झालेले नाही. आई-वडिलांना सांगितले तर जिवे मारून टाकेल अशी देखील त्याने आपल्याला धमकी दिलेली आहे असे देखील तिचे म्हणणे आहे.

गाडगे नगर पोलिसात या प्रकरणी गौरव पवार ( राहणार देशमुख लॉन जवळ अमरावती ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीने तिच्याकडे कॉलेजमध्ये येऊन एकदा मोबाईल मागितला होता . मोबाईल दिला नाही तर तुला जीवे मारेल असे देखील तो म्हणाला त्यानंतर तिने त्याला दोन वेळा नवीन मोबाईल घेऊन दिला सोबत रिचार्जला सहाशे रुपये देखील दिले. 14 एप्रिल रोजी त्याने मोबाईल आणि पैसे आणले आहेत का ? असे तिला विचारले तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण केली . 21 तारखेला गाडी डवत तिचा मोबाईल हिसकावून त्याने पलायन केले असे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे.