शुद्धीवर आली तेव्हा ‘ ती ‘ नग्न अवस्थेत लॉजवर होती , आरोपी ताब्यात

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती येथे समोर आलेली असून एका व्यक्तीने एका मुलीला ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले त्यानंतर ती बेशुद्ध झाल्याचा फायदा घेत तिच्यावर एका लॉजमध्ये बलात्कार केला. अंजनगाव सुरजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 मे रोजी ही घटना घडलेली असून पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक करत त्याच्या विरोधात बलात्कार , विनयभंग , शिवीगाळ आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पीडित मुलगी 17 वर्षांची आहे.

उपलब्ध माहितीनुसार , स्वप्निल भुजंगराव रोकडे ( वय 32 राहणार अंजनगाव सुर्जी ) हा एका औषध कंपनीची मीटिंग आटोपल्यानंतर पीडीतेच्या घरी थांबलेला होता त्यावेळी पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात प्रेम संबंध जुळले. ऑगस्ट 2022 मध्ये आरोपीने पीडित मुलीला तिच्या आई-वडिलांची तब्येत ठीक नाही असे सांगत दुचाकीवरून घेऊन गेला आणि त्यानंतर एका ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस पाजला.

ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळलेले असल्याने तिला भोवळ आली आणि त्यानंतर ती शुद्धीवर आली तेव्हा एका लॉजवर ती नग्न अवस्थेत असल्याचे तिच्या लक्षात आले. आरोपीने आपल्यावर अत्याचार केलेला आहे हे देखील तिच्या लक्षात आल्यानंतर तिने आरोपीला याप्रकरणी जाब विचारला त्यावेळी त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली असे तिने तक्रारीत म्हटलेले आहे.

18 मार्च रोजी आरोपीने पीडित मुलीला सातेगाव फाट्यावर बोलावले. तिथे आल्यानंतर माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या आई-वडिलांना खतम करून टाकतो अशी त्याने धमकी दिली सोबतच तिचे केस ओढले आणि तिचा विनयभंग देखील केला. पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना ही बाब समजावून सांगितल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर अखेर या मुलीने चोवीस मे रोजी पोलिसात दाखल होत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे . त्याला अटक करण्यात आलेली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.