
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यानंतर महाराष्ट्रातून पळ काढणारा बागेश्वर बाबा याच्या दरबारात आजही अनेक भक्तांची गर्दी होत असून बिहारमधून फेब्रुवारी महिन्यात मध्यप्रदेशातील छतरपुर येथील त्याच्या आश्रमात आलेला एक शिक्षक अद्यापही बेपत्ता आहे. त्याचे कुटुंबीय स्टेशनवर जाऊन अक्षरशः फोटो दाखवत त्याचा शोध घेत आहेत. घरच्यांची हालत अत्यंत खराब झालेली असून या शिक्षकाला शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे तर दुसरीकडे बागेश्वर बाबाला चौकशीसाठी देखील बोलवण्याचे सौजन्य पोलिसांनी अद्यापपर्यंत दाखवलेले नाही.
मध्यप्रदेशातील छतरपुर जिल्ह्यात बागेश्वरधाम असून लालन कुमार नावाचे शिक्षक फेब्रुवारी महिन्यात बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून बागेश्वर धाम इथे आलेले होते त्यानंतर ते बेपत्ता झालेले आहेत . बागेश्वर धाम येथे आल्यानंतर त्यांनी घरच्यांना या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर त्यांचा अद्यापपर्यंत काहीही पत्ता आढळून आलेला नाही.
लालन यांचे लहान भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असून साधारण वर्षाला साधारण बारा लाख रुपयांचे पॅकेज त्यांना मिळते . दर महिन्याला एक लाख रुपये महिना कमवत असताना गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी नोकरी सोडून भावाचा शोध सुरू केलेला आहे. घरच्यांची हालत अत्यंत खराब झालेली असून आई तीन महिन्यांपासून अंथरुणाला खेळून आहे. बहीण आणि पुतण्याची देखील अशीच परिस्थिती असून लवकरात लवकर माझ्या भावाची भेट मला घडवून द्या असे आवाहन करत ते सातत्याने आपल्या भावाचा शोध घेत आहेत.
सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असलेले त्यांचे भाऊ यांनी बागेश्वर बाबा आणि त्याचा दिव्य दरबार याच्यावर आपला कुठलाही भरोसा नाही असे सांगितलेले असून आपल्या भावाची मात्र या बागेश्वर बाबावर श्रद्धा होती त्यामुळे तो त्यांच्या दर्शनासाठी म्हणून मध्य प्रदेशात आलेला होता मात्र त्यानंतर तो गायब झालेला असून अद्यापपर्यंत त्याची कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही असे त्यांनी म्हटलेले आहे.