शरद पवार गटाकडून तिघांच्याही ‘ फ्लेक्स ‘ ला मारले जोडे

शेअर करा

जालना येथील घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात संतापाचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाची देखील मोठ्या प्रमाणात गोची निर्माण झालेली आहे . जालन्यातील घटनेचा निषेध करताना राज्यातील सोलापूर जिल्ह्यात एका पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकत्रित फ्लेक्सला मराठा बांधवांकडून जोडे मारण्यात आलेले आहेत.

शुक्रवारी एक तारखेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी लाठीचार्ज करत मराठा आंदोलकांवर गोळीबार देखील केलेला होता. या घटनेचे सोलापूर इथे देखील तीव्र प्रतिसाद उमटत असून संभाजी ब्रिगेडच्या वतीने उत्तर सोलापूर येथील कोंडी इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतिमेला भरचौकात जोडे मारत लाठीचार्ज आणि गोळीबाराचा निषेध केलेला आहे.


शेअर करा