चक्क जमिनीतून बाळाचा पाय बाहेर आलेला , ग्रामस्थ जमले अन..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूर इथे समोर आलेले असून शेतातील एका जमिनीत चक्क जिवंत गाडलेले नवजात अर्भक गावकऱ्यांना आढळून आलेले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संशयित अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला असून कानपूर येथील मुसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलंदर येथील हे प्रकरण आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शेतातून जात असलेल्या काही ग्रामस्थांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आलेला होता हा आवाज ऐकल्यानंतर ग्रामस्थ त्या दिशेने गेले त्यावेळी त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांना धक्काच बसला. बाळाच्या रडण्याचा आवाज हा चक्क जमिनीच्या खालून येत होता तर बाळाचा एक पाय जमिनीच्या बाहेर आलेला देखील त्यांना दिसून आला .

गावकऱ्यांनी एकत्र येत त्यानंतर सर्व माती बाजूला केली आणि बाळाला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत सुमारे आठ ते नऊ तासांपूर्वीच त्याचा जन्म झालेला होता असे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे. देवीपूर रुग्णालयात या बाळावर उपचार सुरू असून बाळ निरोगी आहे पोलीस हा प्रकार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.


शेअर करा