पेट्रोलच्या गोड वासाने तिला ‘ किक ‘ बसायची , दामिनी पथकाकडून महिला ताब्यात

शेअर करा

छत्रपती संभाजीनगर इथे एक अजब घटना समोर आलेली असून एका महिलेला व्यसन करण्यासाठी चक्क पेट्रोलची सवय लागलेली होती . सुरुवातीला तिने एकदा हा प्रकार करून पाहिला आणि त्यानंतर व्यसनासाठी ती नियमितपणे पेट्रोलचा वापर करू लागली . पेट्रोल पोटात गेल्यानंतर तिला नशा यायची आणि त्याचीच सवय तिला लागलेली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी दामिनी पथकाच्या मदतीने तिला ताब्यात घेतलेले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही महिला पेट्रोल पिण्याच्या इतकी आहारी गेलेली होती की अनेकदा पेट्रोल मिळाले नाही तर तिचा जीव कासावीस व्हायचा. आर्थिक अडचण या महिलेला असल्याकारणाने नियमितपणे तिला पेट्रोल मिळत नव्हते म्हणून तिने चक्क पेट्रोल चोरण्यास देखील सुरुवात केली.

दुचाकी गाड्या परिसरात लावलेल्या असत त्यावेळी ती रात्रीच्या सुमारास जायची आणि गाड्यांमधील पेट्रोल काढायची. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील तिचा हा प्रकार कैद झालेला होता त्यानंतर काही नागरिकांनी देखील या प्रकाराची तक्रार केली आणि अखेर तिच्यापर्यंत पोलीस पोहोचले त्यावेळी तिने या धक्कादायक व्यसनाची कबुली दिलेली आहे.


शेअर करा