पुन्हा मराठी माणसाला घर नाकारण्याची घटना , निम्मा व्यवहार झाल्यावर नकार

शेअर करा

काही दिवसांपूर्वी एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचे प्रकरण मुलुंडमध्ये समोर आलेले होते पुन्हा एकदा अशा स्वरूपाची एक घटना भाईंदरमध्ये समोर आलेली असून एका कुटुंबाला ते मराठी असल्याकारणाने घर खरेदीला नकार देण्यात आलेला आहे. सदर कुटुंबाने खरेदीसाठी निम्मा व्यवहार देखील पूर्ण केलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार , भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्लीत गणेश रणखांबे हे त्यांच्या कुटुंबासह भाड्याच्या खोलीत राहायला आहेत . गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच्या मालकीचे घर ते परिसरात शोधत होते त्यावेळी जैन मंदिराजवळ जय श्रीपाल नावाच्या इमारतीत एका सदनिकेची विक्री करायची असल्या कारणाने त्यांनी मालकाशी संपर्क साधला आणि 25 लाख रुपयात व्यवहार देखील ठरवलेला होता.

मार्च महिन्यात त्यांनी सात लाख रुपये घर मालकाला दिले त्याची नोंदही झाली आणि उर्वरित पैसे देण्यासाठी कर्ज काढायचे असल्याकारणाने सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राची त्यांना गरज होती मात्र मराठी असल्याकारणाने त्यांना ते सोसायटीने दिले नाही सोबतच घर मालकाने देखील व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली असे रणखांबे यांनी म्हटलेले आहे.

रणखांबे यांनी आणखीन याप्रकरणी आणखी माहिती देताना याच इमारतीतील काही सदनिकांची विक्री केल्यानंतर नवीन खरेदीदारांना ना हरकत सोसायटीने सहज दिलेले आहे. सोसायटीतील इतर व्यक्ती हे अन्य भाषिक असल्याने त्यांना अडचण आली नाही मात्र आपण मराठी भाषक असल्याकारणाने आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे असे त्यांनी म्हटलेले आहे. सदर प्रकरणी मनसेचे हरेश सुतार यांनी दखल घेत तीन दिवसात ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही तर कठोर भूमिका घेण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिलेला आहे.


शेअर करा