
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण दिल्लीत समोर आलेले असून एका ओयो हॉटेलमध्ये एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. दोन मुलांची आई असलेली महिला एका तरुणासोबत तिथे आलेली होती आणि चार तासांसाठी त्यांनी रूम बुक केली. चार तास ते बाहेर आले नाहीत म्हणून हॉटेल चालकांने पोलिसांना बोलावले त्यावेळी तरुणाने पंख्याला गळफास घेतलेला होता तर महिला फरशीवर मयत अवस्थेत पडलेली होती. तिच्या गळ्यावर खुणा होत्या. पोलिसांना त्या ठिकाणी सुसाईड नोट देखील सापडलेली असून दोघांनी आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , दिल्लीतील मौजपुर मेट्रो स्टेशनजवळील जाफराबाद येथील ही घटना असून शुक्रवारी रात्री हा प्रकार समोर आलेला आहे. मयत व्यक्ती याचे नाव सोहराब तर त्याची प्रेयसी आयशा यांचे एकमेकांवर प्रेम होते. आयेशा ही विवाहित होती. तिला दोन लहान मुले देखील आहेत. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ते हॉटेलमध्ये आलेले होते मात्र संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यांनी वेटरला काही उत्तर दिले नाही म्हणून प्रकरण पोलिसात पोहोचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘ जाफराबाद पोलिसांना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मेट्रो स्टेशनच्या एका हॉटेलमधून कॉल आला त्यामध्ये खोली उघडली जात नाही असे सांगण्यात आलेले होते . पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी सोहराब याने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती तर आयेशा खाली पडलेली होती आणि तिच्या मानेवर जखमेचे व्रण होते .’
मयत सोहराब हा मेरठचा असून त्याच्या कुटुंबाशी पोलिसांनी संपर्क केलेला आहे. महिलेचा पती देखील घटनास्थळी दाखल झालेला असून त्याने सोहराब हा कोण आहे त्याला आपण ओळखत नाही असे म्हटलेले आहे. पोलिसांनी खोलीत तपासणी केली त्यात आयेशाने लिहिलेली एक हिंदीतील सुसाईड नोट आढळून आलेली असून त्यावरून दोघांनी सोबत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे असे दिसून येत आहे.