
इजरायल आणि हमास यांच्यातील वादात धार्मिक अँगल शोधण्याचा प्रयत्न गोदी मीडिया करत असून त्यातून इतर धर्मांच्या नागरिकांना दुय्यम लेखण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेला असून इजराइलच्या झेंड्याचे कागदी स्टिकर रस्त्यावर चिटकवून पायदळी तुडवले जाईल अशा पद्धतीने हा प्रकार करण्यात आलेला होता.
उपलब्ध माहितीनुसार , 22 ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते अकराच्या सुमारास हर्सूल टी पॉइंट पासून दिल्लीगेट रस्त्यावरील आजाद कॉलेजच्या गेट समोर हा प्रकार करण्यात आलेला होता. इजराइल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असल्याने या युद्धाला धार्मिक अँगल देण्याचा गोदी मीडियाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
काही अज्ञात व्यक्तींनी इजरायलच्या राष्ट्रध्वजाचे कागदी स्टिकर बनवून भररस्त्यात चिटकवून दिले जेणेकरून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या ते पायदळी तुडवले जाईल. सामाजिक शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आलेला असून पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.