‘ तुमचा मुलगा कुठे आहे ? ‘ रोज त्याच त्याच त्रासाला कुटुंब वैतागलं अन..

शेअर करा

महाराष्ट्रात भावात होणारे वाद काही नवीन नाहीत मात्र याच वादातून लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ इथे सावरगाव शिवारात मोठ्या भावाचा लहान भावाने डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केलेला आहे . दोन नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडलेली असून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मुशिराबाद येथील रहिवासी असलेले तानाजी काळे यांची शिरूर अनंतपाळ गाव तालुक्यात सावरगाव शिवारात शेती आहे. तानाजी काळे यांना दोन मुले होती यातील मोठा मुलगा शिवाजी काळे हा अविवाहित असून दारू पिऊन चोऱ्या माऱ्या करायचा त्यामुळे गावातील लोक तानाजी काळे यांच्याकडे सतत चौकशीला येत असायचे.

‘ तुमचा मुलगा कुठे आहे त्याने आमच्याकडे चोरी केली ‘ अशी म्हणून भांडणे नित्याची झाली होती. सदर त्रासाला कंटाळून लहान असलेला भाऊ बालाजी तानाजी काळे याने शेतात झोपलेल्या मोठ्या भावाचा अर्थात शिवाजीचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. दोन नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते साडे अकराच्या दरम्यान त्याने ही हत्या केली.

मयत व्यक्ती यांची बहीण यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दिलेली असून शिरूर अनंतपाळ पोलिसांनी बालाजी तानाजी काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे . त्याला अटक करण्यात आलेली असून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने भावाच्या कृत्याने संपूर्ण कुटुंब त्रस्त झालेले होते त्यामुळे हा प्रकार केला असे म्हटलेले आहे . सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा