
कुणाला मृत्यू कधी कशा पद्धतीने गाठेल याचा काही नेम नाही असाच एक प्रकार नाशिक इथे समोर आलेला असून विहितगाव भागात तंबाखू पिचकारी मारण्यासाठी म्हणून बाहेर आलेल्या एका व्यक्तीचा छतावरून पडल्यानंतर मृत्यू झालेला आहे . मयत व्यक्तीचे नाव चाळीस वर्षे आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रत्नाकर मदन बोराडे ( राहणार मथुरा रोड विहित गाव ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून बोराडे 17 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घराच्या छतावर शतपावली करण्यात करत असताना थुंकण्यासाठी खाली वाकले मात्र त्यावेळी ते इमारतीवरून पडले. तात्काळ त्यांना त्यांचे भाऊ विनोद बोराडे यांनी आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले मात्र रविवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. सदर घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे.