गिरीश बापट यांच्या निधनानंतर निवडणूक का नाही ? पुणेकर भिडला निवडणूक आयोगाला

शेअर करा

पुण्यातील खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे अपेक्षित होते मात्र पोटनिवडणूक घेतली नाही म्हणून पुण्यात कायद्याची पदवी घेणाऱ्या एका व्यक्त तरुणाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे.

पुणे लोकसभेची निवडणूक का घेतली नाही असा त्यांचा सवाल असून यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन देखील सादर करण्यात आलेले होते मात्र निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. माहिती अधिकार कायद्यानुसार त्यावर स्पष्टीकरण देखील मागवण्यात आले त्यालाही चाळीस दिवसांनी समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.

कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक न घेण्याचा निर्णय 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रमाणपत्राद्वारे घेतल्याचे आयोगाने उत्तरात कळवले मात्र त्यांचे हे उत्तर पटले नाही म्हणून सुभोस घोशी या तरुणाने एडवोकेट कुशल मोर , एडवोकेट तयार सिंगला , आणि एडवोकेट प्रवीण सिंग यांच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे .

पुणे महापालिकेचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपलेला आहे त्यानंतर निवडणुक झाली नाही सोबतच तत्कालीन खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर देखील लोकसभेचे पुण्याची जागा अजूनही रिक्त आहे म्हणून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे.


शेअर करा