
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून एका तरुणाला फ्लॅटवर बोलावून त्याचे कपडे उतरवत त्याला नग्न अवस्थेत नाचण्यास भाग पाडण्यात आलेले आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला असून आरोपींनी त्याच्याकडून तब्बल 60 हजार रुपये जबरदस्तीने उकळलेले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी त्यानंतर नग्न अवस्थेतील नाचतानाचा त्याचा व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केला. येरवडा परिसरात पीडित तरुण राहत असून हा प्रकार 13 ते 14 जुलै दरम्यान घडलेला आहे. सोमनाथ कोंडीबा राजभोज , चंद्रकांत बबन लांडगे , संजय आत्माराम सुतार , सुभाष हनुमंतराव भोसले ( सर्वजण राहणार तिसगाव प्रवरानगर ) यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फिर्यादी आणि आरोपी हे दोघे एकाच गावचे असून त्यांच्यात परस्पर ओळख देखील आहे. आरोपींनी 13 जुलै रोजी फोन करून तुझा भाऊ आलेला आहे असे सांगत फिर्यादी व्यक्तीला एकता नगर येथील एका फ्लॅटवर बोलवले आणि त्यानंतर त्याचे कपडे उतरवून त्याला नाचण्यास भाग पाडले. आरोपींनी त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडून 60000 रुपये काढून घेतले आणि त्याचा मोबाईल देखील जाळून टाकला आणि गावाकडच्या व्हाट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ टाकून दिला. आपली बदनामी झाल्याचा दावा करत या तरुणाने अखेर येरवडा पोलिसात धाव घेतली आहे.