ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये रात्रभर महिलेवर बलात्कार , आरोपीवर गुन्हा दाखल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात समोर आलेला असून एका तीस वर्षीय विवाहित महिलेला अमरावतीला आणून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे. 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान हा प्रकार घडलेला असून चिखलदरा पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , सकलु बेठेकर ( राहणार चिखलदरा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तीस वर्षीय महिला नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास गावाकडे पायी चाललेली होती त्यावेळी सकलु तीच्या जवळ आला आणि तिला आपल्या गाडीवर बसवले आणि एका ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये घेऊन गेला. रात्रभर त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले असे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे.


शेअर करा