बुरखा घालून ‘ नको तो ‘ कारनामा करणारे दोन जण ताब्यात , सीसीटीव्हीमध्ये दिसलं की..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा चोरीचा प्रकार समोर आलेला असून मुंबई येथील ही घटना आहे. विशेष म्हणजे या घटनेमध्ये चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडलेला असून भरदिवसा बुरखा परिधान करून घरांमध्ये तो हा प्रकार करायचा आणि चोरी झाल्या केल्यानंतर बुरखा घालून बाहेर पडायचा.

सणासुदीच्या दिवसात चोरींच्या घटनात वाढ होत असल्याने पोलीस सक्रिय आहेत म्हणून त्याने ही शक्कल लढवली होती. सणासुदीला अनेक जण बाहेरगावी जाताच ही संधी शोधत अशाच पद्धतीने तो चोऱ्या करायचा. सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्याचा हा कारनामा कैद झालेला आहे. मुंबई अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी भर दिवसा चोऱ्या करत असल्याचे दिसून येत आहे.

सदर चोरट्याचे नाव हे रईस अब्दुल अहद शेख ( वय 36 ) व वसीम खालील खान उर्फ बिल्ला ( वय 33 ) असे असून पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे . मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केलेली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस बुरखाधारी असलेल्या या व्यक्तींवर नजर ठेवून होते त्यानंतर दोन्ही चोरटे पोलिसांच्या ताब्यात आलेले असून अशाच पद्धतीने त्यांनी किती चोऱ्या केल्या आहेत याचा देखील पोलिस आता तपास करत आहेत.


शेअर करा