कुत्रे फिरवण्यासाठी गेलेल्या तरुणाला गाठलं अन.., पोलिसात गुन्हा दाखल

शेअर करा

कोल्हापुरात एक अजब प्रकार समोर आलेला असून रात्रीच्या वेळी कुत्रे फिरवण्यासाठी गेलेल्या तरुणाला कारमधून आलेल्या तीन जणांनी अडवले आणि ‘ तुझी मैत्रीण कोण आहे ? अशी विचारणा करत त्याच्या डोक्यात काठीने मारहाण करत त्याचा मोबाईल फोडून टाकला. 15 तारखेला रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , ओंकार श्रीकांत सूर्यवंशी ( वय पंचवीस वर्ष राहणार शिवाजी पेठ ) असे जखमी तरुणाचे नाव असून ओंकार हा मध्यरात्री कुत्रे फिरवण्यासाठी रंकाळा टॉवर परिसरात गेलेला होता त्यावेळी तिथे कारमधून तीन जण आले आणि श्रेयस नावाच्या तरुणाने ‘ तुझी मैत्रीण कोण आहे ? ‘ अशी विचारणा करत ओमकारचा मोबाईल फोडला आणि त्यानंतर सर्वजण मारहाण केल्यावर दमदाटी करत तिथून निघून गेले. पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा