गुजरातचे दोन जण एपीएमसी मार्केटमधून ताब्यात , एकाने लग्नाचं स्वप्न दाखवायचं अन..

शेअर करा

फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार मुंबईत समोर आलेला असून लग्नासाठी मॅट्रिमोनी साइटवर आयुष्याचा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले आणि त्यानंतर लाखो रुपयांची तिची फसवणूक करण्यात आली. बोरिवली पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , झोरीन सोलंकी ( वय 37 ) आणि पिनाकिन पटेल ( वय 43 ) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून दोघेही गुजरातचे अहमदाबाद येथील रहिवासी आहेत. बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधून बेड्या ठोकण्यात आल्या.

तक्रारदार तरुणी या आई-वडील आणि भावासोबत राहत असून प्रॉपर्टी बिल्डरचे काम करतात. एका विवाहविषयक वेबसाईटवर त्यांनी स्वतःचे नाव नोंदवले होते त्यावेळी त्यांची ओळख वैभव शहा नावाच्या व्यक्तीसोबत झालेली होती. त्याने एक नोव्हेंबर रोजी या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले त्यानंतर ही तरुणी आरोपींच्या जाळ्यात आलेली होती.


शेअर करा