‘ ऑनलाईन तिकीट विक्री ‘ , नंदिनी अन गायत्रीने पुणेकराला हेरलं अन..

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून ऑनलाईन एअर तिकीट विक्रीमधून लाखो रुपये कमवण्याच्या आमिषाने एका व्यवसायिकाची सहा लाख 40 हजार 977 रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. बोपखेल परिसरात फसवणुकीचा प्रकार पाच डिसेंबर पासून तर 14 सप्टेंबरपर्यंत घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अजित नरहर व्यवहारे ( वय 51 राहणारा बोपखेल ) यांनी दिघी पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिलेली असून पोलिसांनी नंदिनी आणि गायत्री या नावाने टेलिग्राम प्रोफाइल वापरणाऱ्या संशयित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. फिर्यादी यांना नंदिनी नावाच्या एका टेलिग्राम धारकाने आपण स्काय स्कॅनर नावाच्या कंपनीचे एजंट आहोत असे सांगत ऑनलाइन तिकीट विक्री केली तर दिवसाला पाच ते सात हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवत फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.


शेअर करा