सोशल मीडिया स्टारचा कथित एमएमएस झाला व्हायरल , गुणगुण म्हणाली की..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालेला होता. नामांकित सेलिब्रिटींचे फोटो एडिट करून सोशल मीडियात व्हायरल करणे हे काही नवीन नाही मात्र आता सोशल मीडिया सेलिब्रिटी देखील अशा व्यक्तींच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणारी गुनगुन गुप्ता हिचा देखील एक कथित एमएमएस व्हायरल झालेला आहे.

व्हायरल झालेल्या एमएमएस मध्ये गुण गुण गुप्ता ही आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येत असून दिवाळीच्या शुभेच्छा देताना तिने हा व्हिडिओ एडिटेड असल्याचे सांगत ‘ तुम्ही आता सगळे हे सर्व थांबवा माझ्यात इतकी शक्ती नाही. ज्यांनी व्हिडिओ एडिट केला त्यांचा हेतू मला बदनाम करणे आणि केवळ व्ह्यूज मिळवणे असा आहे मात्र त्यामुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होते याचा देखील ते विचार करत नाहीत ‘,असे म्हटले आहे.

गुण गुण गुप्ता पुढे म्हणाली की , ‘ तुमच्या नादात एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होते याचा कधीतरी विचार करा . सध्या मी खूप वाईट काळातून जात आहे. जे लोक प्रेम करतात ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही दिवाळीत आनंदी असाल अशी आशा आहे ‘ असे देखील तिने इंस्टाग्राम वर म्हटलेले आहे. अवघ्या 19 वर्षांची गुणगुण ही टिक टॉकवर प्रसिद्ध झालेली होती त्यानंतर ती सध्या इंस्टाग्राम रिल्स च्या माध्यमातून सक्रिय आहे तिचे तब्बल 58 लाख फॉलोवर इंस्टाग्राम वर असून तिचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आलेला आहे.


शेअर करा