किरकोळ वादातून पुण्यात गच्चीवरून ढकललं , आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शेअर करा

पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून दारू पिताना झालेल्या वादातून गच्चीत थांबलेल्या मित्राला धक्का दिला आणि त्यानंतर गच्चीवरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार नगर रोडवरील वडगाव शेरी परिसरात घडलेला आहे. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , बैजू लक्ष्मी मंडळ ( वय 35 वर्ष सध्या राहणार संजय गांधी सोसायटी वडगाव शेरी मूळ राहणार बिहार ) असे मयत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी शंभू दपीराम ( वय 47 ) याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे.

मयत बैजू हे मोलमजुरी करून पुण्यात उदरनिर्वाह करत होते. संजय गांधी सोसायटीमध्ये त्यांनी भाड्याने खोली घेतलेली होती. आरोपी शंभू आणि बैजू हे किराणा दुकानातून माल खरेदी करून स्वयंपाक करत असायचे. शंभू याला उधारी किराणा माल देऊ नको असे बैजू याने दुकानदाराला सांगितले होते म्हणून त्यांच्यात वाद झाला त्यावेळी शंभूने बैजू याला ढकलून दिले त्यात बैजू याचा मृत्यू झालेला आहे.


शेअर करा